मडगाव :गोयंकारपण वृत्त
कोविड प्रकरणात भारताने नुकत्याच आलेल्या लाटांचा सामना करत असताना ‘सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमा’चा एक भाग म्हणून कोकण रेल्वेने दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ‘वैयक्तिक संरक्षक उपकरणे’ दान केली.
पीपीई किट्स, सेफ्टी गॉगल, एन 95 मुखवटे, चेहरा शिल्ड , नायट्राईट हँड ग्लोव्हज, हेडकव्हर्स आणि डिस्पोजेबल बॅग्ज यापैकी प्रत्येकी २०० नग देणग्या दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
पूर्वी कोकण रेल्वे देशाच्या गरजा भगवण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. सर्वत्र येणारी (साथीची) महामारी असूनही रेल्वेने आपल्या मार्गावर विशेष गाड्या चालवून आणि देशभरातील अत्यावश्यक सेवा वाहतूक करून देशवासीयांच्या कल्याणासाठी आपली वचनबद्धता चालू ठेवली आहे.
कोकण रेल्वे आमच्या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते आणि कोविड (साथीचा रोग) सर्व देशभर येणाऱ्या साथीला सामोरे जाण्यासाठी देशाच्या मदतीसाठी हातमिळवणी करते, असे कळवण्यात आले आहे.