वास्कोःगोयंकारपण वृत्त
पेडणे पोलिसांनी 8 मे रोजी त्यांचा सदस्य सूर्यकांत चोडणकर यांना नाहक अटक केल्याचा ‘गोयचो आवाज पक्षा ‘ने (जीएपी )तीव्र निषेध केला.
कोविड विषाणूचा व्यापक प्रसार रोखण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयश आल्यानंतर आणि लोकांकडून आवश्यक ‘एसओपी’चे पालन केले जाते की नाही याची खात्री करून घेण्यासाठी सूर्यकांत चोडणकर यांनी पेडणे बाजारातील मिठाई दुकानाची पाहणी करण्यासाठी दोन दुकानदारांकडे संपर्क साधला. त्यांनी नियम व आवश्यकतेनुसार मास्क घालण्याची विनंती केली. मात्र
त्यांनी या विनंतीचे पालन करण्यास नकार दिल्याने सूर्यकांत यांनी त्यांच्या उल्लंघनाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सुरवात केली
धक्कादायक म्हणजे, या कृतीला विरोध या दोन्ही परप्रांतीयांनी सूर्यकांतवर काठीने हल्ला करून दोन्ही हात जखमी केले आणि काठीने त्याचा मोबाईलही तोडल्याची तक्रार पोलिसात केली. त्यानंतर त्यां या दोघांनी सूर्यकांतविरूद्ध पेडणे पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावर तुटलेला मोबाईल व सुजलेल्या हातांचा पुरावा दाखवताना सूर्यकांतला ताबडतोब अटक केली आणि त्याचे वैद्यकीय नपरीक्षण करण्यात आले.
त्यांच्या वडिलांवरील हल्ल्याबद्दल सूर्यकांतच्या कुटुंबीयांनी पेडणे पोलिसात तक्रार दाखल केली असली तरी त्या मारवाडी जोडीवर कोणतीही कारवाई झाली नाही. या मारवाड्यांचा इतका प्रभाव होता की जखमी सूर्यकांतला जामीनही नाकारला गेला.
या विषयी गोयंचो आवाजचे अध्यक्ष स्वप्नेश शेरलेकर
म्हणाले, “ सरकारकडून गोवा पूर्णपणे परप्रांतीय लोकांच्या ताब्यात देण्यात आला आहे हे दाखवणाऱ्या उदाहरणची लांबलचक मालिका आहे.मुख्यमंत्र्यांनी नुकतेच घोषित केले की आपण गोव्यातील बहुमोल आणि क्वचित उत्पादित होणारा ऑक्सिजन वेर्णा येथून सिंधुदुर्गला पाठवत आहोत. दानधर्म घरी सुरू होते. ऑक्सिजनच्या अभावी गोमंतकियाचा मृत्यू होतो, त्यावेळी मुख्यमंत्री दुर्लक्ष कसे करू करतात? ”
सूर्यकांत चोडणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि त्याच्याविरूद्ध झलेल्या पोलिस कारवाईचा
गोयचो आवाज संघटनेने निषेध केला आहे.