पणजी :गोयंकारपण वृत्त
सीमा शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त वाय.बी. सहारे यांच्या नेतृत्वखाली गोवा कस्टमच्या ‘एअर इंटेलिजेंस युनिट’ने दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर अरेबियाच्या विमानाने शारजाहून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशाच्या बैगमधून 1.175 किलोग्रॅम वजनाचे सोनं जप्त केले.
हा प्रवासी भारतीय पासपोर्ट धारक, कर्नाटकमधील भटकळचा रहिवासी आहे.
गोवा कस्टमच्या अधिका्यांनी प्रवाशांच्या चेक-इन बॅगेजमध्ये लपवून ठेवलेल्या दहा तोळे बार आणि एक सोनसाखळी जप्त केली.
सीमाशुल्क कायदा 1963च्या तरतुदीनुसार हे सोने ताब्यात घेण्यात आले असून प्रवाश्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर सोन्याच्या तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंधरवड्यात गोवा कस्टमने नोंदवलेले हे तिसरे सुवर्ण तस्करी प्रकरण आहे.
2021 सालामध्ये गोवा सीमाशुल्क कंपनीने आतापर्यंत 2.31 कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे.