पणजी:गोयंकारपण वृत्त
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 9 मे पासून दोन आठवड्यांचा लागू केलेल्या ‘कर्फु’ मुळे कोरोनाची प्रकरणे 41 टक्के खाली आल्यामुळे सरकारी आदेशाचे खरोखरच सार्थक झाल्याचे दिसत आहे.
9 मे ते 21 मे पर्यंतच्या शेवटच्या 15 दिवसांत 34,925 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यात 44548 जण बरे झाले आहेत . तथापि, गेल्या 15 दिवसांत आतापर्यंत 801 लोकांचा बळी गेला असल्याने ती चिन्तेची बाब ठरली आहे.
सध्याची सक्रिय प्रकरणे 19,328 आहेत, जी 15 दिवसांपूर्वी जवळपास 33 हजाराच्या घरात होती.
आता,राज्य सरकारने 31 मे 2021 पर्यंत कर्फ्यू आणखी आठवड्यात वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे ही प्रकरणे बरीच कमी होण्यास मदत होऊ शकेल.
गोवा वैद्यकीय हॉस्पिटल व महाविद्यालयामधील (गोमेकॉ ) कोविड रुग्णांच्या मृत्यूमध्ये हळूहळू घसरण दिसून येत आहे,कारण सरकारने २० हजार लिटर ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन’ (एलएमओ) टँक बसविला आहे.जो थेट वॉर्डांना ऑक्सिजन पुरवतो आणि ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या पूर्वीच्या जुन्या ट्रॅक्टरद्वारे सिलेंडर ट्रॉलीच्या प्रणालीची जागा घेतो .
ही टाकी 15 मे रोजी संध्याकाळी कार्यरत झाली. रुग्णालयात ११ मे रोजी 48 मृत्यू तर बुधवारी ते कमी होऊन 18 वर आले.
गोमेकॉ येथील कोविड वार्डचे प्रभारी नोडल अधिकारी डॉ. विराज खांडेपारकर यांनी सांगितले की, उपचारांच्या प्रोटोकॉलमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही आणि मृत्यूच्या घटनेसोबत नवे रुग्णांचा प्रवेशही कमी झाला आहे.
“गेल्या वर्षीदेखील मृत्यूंमध्ये वाढ झाली होती आणि नंतर ते घटले होते. सर्वात वाईट परिस्थिती संपल्यास पुढचे काही दिवस हा कल लक्षात घ्यावा लागेल.”
“ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपण बर्यापैकी तणावातून गेलो आहोत. नवीन टाकीमुळे रूग्णांना ऑक्सिजन मिळाला आहे पण डॉक्टरांना खरे जीवन मिळाले आहे, ”असे खांडेकर म्हणाले.
* *रिक्त बेडचे प्रमाण वाढले*
कोविडच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे आणि बहुतेक संक्रमित व्यक्ती गृह अलगीकरणचाच पर्याय निवडत आहेत. सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये रिक्त खाटाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असा दावा आरोग्य विभागातील एका अधिका-यांनी केला आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे, की राज्यात जवळजवळ 500 बेड्स रिक्त असून त्यापैकी 125 गोवा मेडिकल कॉलेजमध्ये बेड रिकामे आहेत. काही आठवड्यापूर्वीच रुग्णांचे नातेवाईक सर्वत्र ऑक्सिजनयुक्त बेडसाठी जीवाचा आटापिटा करीत होते.
*तिसर्या लाटेची तयारी*
आत्मसंतुष्टतेस जागा न ठेवता गोवा सरकारने राज्यातील कोविडच्या तिसर्या लहरीसाठी लढा देण्यासाठी तज्ञाची एक टास्क फोर्स तयार केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या 15 सदस्यीय टास्क फोर्समध्ये डॉक्टरांसह 15 सदस्य असतील.टास्क फोर्सने शुक्रवारी दुपारी पहिली बैठक घेतली.
तिसर्या लहरीच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी स्वतःस सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकारने राबविलेल्या विविध कृतींबद्दल टास्क फोर्सने विचार केला.
राज्यातील कोविड प्रोटोकॉल व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा सुचविण्याकरिता डीन डॉ. एस एम बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टरांची तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
पॅनेलमध्ये बालरोग असतील कारण अशी अपेक्षा आहे की तिसऱ्या लाटेचा फटका अधिकतर मुलांना बसण्याची शक्यता आहे.