काणकोण :गोयंकारपण वृत्त
सतत दुसऱ्या दिवशी महामारीची भीती कमी होताना,स्थानिक लोकांना तौकते वादळाने काणकोण किनारी भागातच नव्हे तर अंतर्गत भागातही झोडपले.
काणकोण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एका बाजूने वाढण्याचे संकट डोक्यावर असताना, दुसऱ्या बाजूने तौकते चक्रीवादळच्या तडाख्यामुळे लोकांच्या हालअपेष्ठामध्ये अधिक भर पडली गेली आहे.
काणकोण तालुक्यातील अनेक घरंपासून, वीजचे खांब , मासेमारी नौका आणि कृषी बागायती वृक्षांची मोठी हानी झाली आहे.
त्यात भर म्हणून पूर्ण तालुक्यात विविध भागांमध्ये वीज वितरण करणारे खांब कोसळल्याने शनिवारी रात्रीपासून ‘ब्लॅकआउट’ला तोंड द्यावे लागत आहे. वीज पुरवठा नसल्याने रविवारी दिवसभर वीज नसल्याचे सूत्रांनी माहिती दिली. गालजीबाग , तळपण , राजबाग, पाटणे , पाळोले , आगोंद आणि खोला यां किनारपट्टीवरील वाळूच्या टेकड्या मोठया लाटाच्या तडाखाने नष्ट झाल्या आहेत. म्हणूनच किनाऱ्याच्या जवळ असलेली घराचे आणि मासेमारी नौकांचे मोठे नुकसान झाले आहे. आगोंद येथील वन्यपशु विभागाद्वारे बांधण्यात आलेली कासव संवर्धन जागाही वाहून गेली आहे. गालजीबाग येथील कासव संवर्धन जागाही
बुडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गालजीबाग नदी आणि अरबियन समुद्रामधला वाळूचा पट्टा आणखी वाहून जात आहे. गाळजीबाग नदीत पाण्याची उंची सतत दुसऱ्या दिवशी अर्धा मीटर वाढली असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास भरतीच्या लाटा आत शिरल्यामुळे गालजीबागची वाळू पट्टी पूर्ण पाण्याखाली गेली होती.
या क्षेत्रातील एक रहिवासी मनोज प्रेभुगावकर म्हणाले, की या घटनेचा गालजीबाग नदीच्या काठावर असलेल्या खारफुटीवर अल्पकालीन आणि दीर्घकालीन असा प्रभाव पडण्याची शक्यता असेल. नदीच्या किमान 2 किलोमीटर दूरपर्यंत याचा प्रभाव झाला असणार . गालजीबाग येथील सेबी बेराठो यांनी सांगितले की, गेल्या 3 वर्षांत त्यांनी ग्रामीण पंचायतसह विविध मंचावर या संबधी आवाज उठवला होता. परंतु स्थानिक पंच तसेच प्रशासन अधिकारीही या समस्येबाबत गंभीर नाहीत.पूर्ण गाव सखल भागात असल्याने नदीच्या जवळ राहत असलेल्या गावकऱ्याचा जीव व मालमत्ता धोक्यात आहे.
दरम्यान,तालुकातून जाणाऱ्या चक्रीवादळच्या वाऱ्यामुळे अनेक वृक्ष कोसळले असून अनेकांच्या छतही उडून गेले आहे . पाळोले आणि आगोंद भागात पाणी साचून राहिले आहे.