मडगाव :गोयंकारपण वृत्त
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने आज
‘मार्क्वाअर फार्म,’ मुगाली, उगे, सांगे येथे सूक्ष्म कंटेन्टमेन्ट झोन म्हणून जाहीर केला.
जिल्हाधिकाऱ्यानी या जागेसंबधी तपशीलवार कृती आराखडा जाहीर करताना आरोग्य उपाय लागू केले आहेत.संशयास्पद रुग्णांची आरोग्य तपासणी आणि चाचणी, अलग ठेवणे, सामाजिक अंतर तपासण्यासह परिस्थितीचा सामना करण्यासाठी इतर सार्वजनिक उपाययोजना देखील जारी केली. यावेळी वेगवान प्रतिसाद पथकही तैनात करण्यात आले आहे.
सद्यस्थितीतील परिस्थितीचा प्रतिकार करण्यासाठी ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’मधील लोकांचे स्क्रीनिंग, संशयित प्रकरणी चाचणी, अलगीकरणात ठेवणे, सामाजिक अंतर आणि इतर सार्वजनिक आरोग्य उपायांसह कृती योजना राबविण्यास सूचविले आहे.
उपरोक्त क्षेत्रातील आजारी व्यक्तींची फिरत्या पथकाद्वारे आरोग्य तपासणी करून घ्यावी व त्यामध्ये लाल शाईने आजारी असलेल्या व्यक्तीची यादी तयार केली जावी. जेणेकरून पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल. आवश्यकतेनुसार सर्व पॉझिटिव्ह प्रकरणे पुढील व्यवस्थापनासाठी कोविड केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात हलविण्यात येतील, असे कळवण्यात आले आहे.