काणकोण:गोयंकारपण वृत्त
गोव्याच्या दक्षिणेकडील टोकाच्या भागात ‘डायलिसिस युनिट’ चालविणारे डॉ. वेंकटेश यांनी राज्य सरकारच्या व्हेन्टिलेटरच्या खरेदीतील घोटाळा उघडकीस आणला आहे.डॉक्टरांचा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.
प्रत्यक्ष किंमतीपेक्षा 4 पट अधिक देऊन दोन लाख रुपयांच्या व्हेंटिलेटर खरेदी केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. तथापि, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना विचारले असता त्यांनी असा सवाल केला की, सरकारने खरेदी केलेले वेंटिलेटर उत्तम दर्जाचे असून सक्षम अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली आहे.
“त्या विशिष्ट डॉक्टरला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, होस्पिसिओ हॉस्पिटल, मडगावमधून काढून टाकण्यात आले होते. कारण ते सरकारचे कायम भाडेकरुसारखे वागत होते.
आम्ही त्यांना आता किंमत देत नसल्याने ते आरोप करत आहेत.” राणे म्हणाले.
डॉक्टर व्यंकटेश म्हणाले,
“घोटाळा उघडकीस आल्यानंतर मला आता बर्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे.आरोग्यमंत्री राणे मला धमकावत आहेत आणि
गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत असलेले हे युनिट बंद करण्यास भाग पाडत आहेत.”
व्हेंटिलेटर खरेदीमध्ये घोटाळा केल्याबद्दल आरोग्य मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केल्याची माहितीही काणकोणच्या डॉक्टरांनी दिली.
“दोन लाख रुपये किंमतीचे व्हेंटिलेटर राणे यांनी तब्बल .8.5 लाखात खरेदी केले आहे, जे किंमतीपेक्षा चार पट आहे.” डॉ.व्यंकटेश यांनी आरोप केला.
ते पुढे म्हणाले की, राणे यांनी प्रत्येक व्हेन्टीलेटरमागे 6.50 लाख रुपये स्वत:कडे ठेवले आहेत.म्हणून मी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे ”
सरकारने खरेदी केलेले व्हेंटिलेटर उत्तम दर्जाचे असून सक्षम अधिकाऱ्यांमार्फत त्यांची तपासणी केली जात आहे, असा दावा राणे यांनी केला. मागील वर्षी कोरोनाव्हायरस देशव्यापी लॉकडाउन लागू झाल्यानंतर व्हेंटिलेटरची उपलब्धता नव्हती.सरकारने अमेरिकेतून २०० व्हेंटिलेटर आयात केले आणि ते त्या काळातील उत्तम प्रतीचे असे होते.
सर्व २०० व्हेंटिलेटर वापरात आहेत, ते वापरकर्त्यासाठी अनुकूल असून सर्व डॉक्टर त्यांच्या कामगिरीवर खूश आहेत.
Trending
- Three More Held in Cunchelim Land Scam, Remanded to Two Days Police Custody
- BJP Cracks Whip on Indiscipline; MLAs Told to Avoid Internal Blame Game
- CM Urges Sports Associations to Take Responsibility for Ground Maintenance
- Margao SC Thrash Carmona 6-0 to Storm Into Quarterfinals of St. Anthony Festival Cup
- CM Warns: Youth Health at Risk Due to Mobile Addiction
- Goa to Introduce AI in School Curriculum Under New AI Mission 2027
- Yuri Alemao Refuses to Comment on Vijai Sardesai’s Criticism, Says Focus is on Opposition Unity
- Modi Gave India Ram Mandir and 5G, Says Amit Shah, Emphasizing Blend of Tradition and Technology