पणजी :गोयंकारपण वृत्त
आपच्या गोवा वैद्यकीय कक्षाचे प्रमुख डॉ. मारियान्हो गुदीन्हो यांनी गोव्याला ‘इव्हर्मेक्टिन’च्या गोळ्या देण्याच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित केला.जेव्हा देशातील इतर राज्यांसह जगात कुठेही ही टॅब्लेट रोगप्रतिबंधक उपचारांसाठी वापरली जात नाही. आणि रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी तर नाहीच नाही. विशेषत: (WHO) जागतिक आरोग्य संघटनेने त्याच्या वापराची शिफारस केलेली नाही आणि जगात इतरत्र कोठेही तो स्वीकारला जात नाही, असे गुदिन्हो म्हणाले.
राहुल म्हांबरे यांनी लक्ष वेधले की, गेल्या 19 दिवसांत कोविडमुळे 1000 हून अधिक गोमंतकीयांचा मृत्यू झाला आहे. मात्र जेव्हा यावर प्रश्न उपस्थित केले जातात,त्यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे मात्र नेमलेल्या तथाकथित तज्ज्ञ कमिटीचा उल्लेख करतात.“सदर समितीत कुठलाही तज्ज्ञ व्यक्ती नाही. केवळ विश्वजित राणे यांच्या दुष्कर्मांवर पांघरूण घालणे हेच या समितीचे काम आहे. राणे या तथाकथित समितीच्या एकाही सदस्याचे नाव का घेत नाही?,” असा प्रश्न राहुल यांनी विचारला.
“डॉक्टर असोसिएशनने स्पष्टीकरण दिले की, भारतीय वैद्यकीय संघटनेशी सुद्धा या गोळ्यांच्या विषयी सल्लामसलत केली गेली नाही. इव्हर्मेक्टिनच्या गोळ्या भाजप आणि राणे गोयंकरांवर जाणीवपूर्वक थोपवत आहे.कारण पुढच्या निवडणुकीसाठी त्यांना फंड जमा करायचा आहे.सदर गोळ्या गोव्यावर जबरदस्तीने थोपविले गेल्या असल्याचा आरोप म्हांबरे यांनी केला.
तसेच सरकारने गोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या की नाही ते सांगावे? जर असेल तर हा करार कोणाकडे होता आणि किती पैसे यासाठी मोजले,ते स्पष्ट करावे, अशी मागणी म्हांबरे यांनी केली.