पणजी :गोयंकारपण वृत्त
‘तहलका’ मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांच्याविरोधात 2013 मध्ये दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणात मापसा फास्ट ट्रॅक कोर्ट २१ मे रोजी आपला निकाल जाहीर करणार आहे.
हा निकाल बुधवारी जाहीर होणार होता पण गेल्या काही दिवसांत वीज नसल्यामुळे कोर्टाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
तत्पूर्वी, विशेष सरकारी वकील फ्रान्सिस्को टाव्होरा यांनी माध्यमांना सांगितले की, आरोपीला दोषी ठरविण्यात आल्यास “न्यायाधीशांच्या विवेकबुद्धीनुसार” किमान 10 वर्षे ते जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
तरुण तेजपाल यांना उत्तर गोव्यातील पंचतारांकित रिसॉर्टमध्ये एका महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाल्यानंतर 2013 मध्ये 30नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
29 सप्टेंबर, 2017 रोजी कोर्टाने त्याच्यावर बलात्कार, लैंगिक छळ आणि चुकीचा बंदीवासासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोप ठेवले होते. तथापि, दोषी नाही अशी विनंती तेजपाल यांनी केली होती.
सप्टेंबर 2017 मध्ये खटला सुरू झाला परंतु उशीर होतच राहिला.तेजपाल यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपाला आव्हान दिले.
ऑगस्ट 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांची बाजू फेटाळली आणि खटला इन-कॅमेरा (सार्वजनिकरित्या उघडला जाऊ नये) ठेवण्यासाठी आणि सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले.