पणजी :गोयंकारपण वृत्त
लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी सहमती दर्शवत आम आदमी पक्षाने आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पुन्हा एकदा गोवेकरांना दिलासा देण्याचे आवाहन केले.
अखेर लॉकडाऊनची मुदतवाढ करण्याची मागणी सरकारने मान्य केल्याचे पक्षाने निदर्शनास आणून दिले.आपचे गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी लॉकडाऊन वाढीच्या निर्णयाशी सहमती दर्शवताना मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मागणी केली. ते म्हणाले, या विषाणूमुळे पीडित लोकांना मदत करण्याच्या केजरीवाल मॉडेलचे राज्य सरकारने अनुसरण करावे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी याआधी पुरविल्या गेलेल्या सुविधा गोवेकरांना देखील द्याव्यात.
दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या निर्णयांची पुन्हा एकदा थोडक्यात माहिती
राहुल म्हांबरे यांनी दिली. ती
गोमंतकियानाही अशाच प्रकारच्या सुविधा पुरविल्या पाहिजेत, अशी मागणी राहुल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. याशिवाय मोटारसायकल पायलट , लहान व्यवसायिक आणि विक्रेत्यांच्या अडचणींचा विचार करून त्यांनाही दिलासा देण्याचे आवाहन म्हांबरे यांनी केले.
“शिवाय गृहाधार योजनेतील लाभधारकांना अनुदान देखील रखडली आहेत, हे ही लक्षात घेतले पाहिजे. पेट्रोलच्या वाढत्या 91 रुपयांच्या किंमतीमुळे गोवेकरांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. गृहाधारांच्या देयकाकडे दुर्लक्ष करणे आणि त्यात पेट्रोलच्या किंमतीत वाढ करून गोवेकरांच्या जखमेवर मीठ चोळणे, हे मुख्यमंत्र्यांच्या असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे.” असे आप गोव्याच्या उपाध्यक्षा अॅड प्रतिमा कुतीन्हो म्हणाल्या