पणजी -गोयंकारपण वृत्त
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने, मृतदेह हलवणाऱ्या ‘हर्स ‘ वाहनाकडून जादा शुल्काबाबतच्या काही वृत्तांचा हवाला देत म्हटले आहे,की सध्याच्या महामारीच्या परिस्थितीतून कोणालाही नफा मिळवू नये.
हायकोर्टाला यावर राज्याचे ‘अॅडव्होकेट जनरल ‘ ( एजी ) देविदास पांगम यांनी राज्य सरकार या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले.
एजींनी हायकोर्टाला पुढील माहिती दिली की, रुग्णालयात बेडची संख्या वाढल्यामुळे राज्यातील रुग्णवाहिकांवर दबाव कमी झाला आहे.
“जर आपण यापूर्वी पहायला गेलो,तर खाटा कमी असल्यामुळे रुग्णांना रुग्णवाहिकेत थांबावे लागत असे.पण आता बेडमध्ये वाढ झाल्याने परिस्थिती सुधारली आहे आणि रुग्णवाहिका सेवेचा दबाव कमी झाला आहे,” एजी ne स्पष्ट केले.
गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी सरकार व आरोग्य विभागाचे उच्च पदाधिकारी आभासी सुनावणीला उपस्थित होते. यावेळी हायकोर्टाने म्हटले, की आरोग्य यंत्रणेत ऑक्सिजन पुरवठा कायम राखणे हे मुख्य काम आहे.आत्ताच्या गैरव्यवस्थेची जबाबदारी निश्चित करणे हे आमचे सध्या तरी मुख्य उद्दीष्ट नाही.