पणजी :गोयंकारपण वृत्त
ऑक्सिजन पुरवठ्याअभावी ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘(गोमेकॉ )तीन दिवसात जवळपास 60 कोविड रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने अखेर ऑक्सिजन पुरवठा प्रश्नांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे.
‘आयआयटी’चे संचालक डॉ. बी.के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये गोमेकॉचे माजी डीन डॉ. व्ही.एन. जिंदाल आणि नगरविकास खात्याचे सचिव तारिक थॉमस हे सदस्य आहेत.
ऑक्सिजनच्या पुरेशा प्रमाणात पुरवठा नसल्याने भल्या पहाटे रुग्णांचा मृत्यू होत असल्याने,हायकोर्टाने सरकार आणि गोमेकॉला फटकारल्यानंतर ही समिती
स्थापन करण्यात आली आहे.
*संदर्भ*
गोमेकॉला होत असलेला ऑक्सिजन पुरवठा तसेच ऑक्सिजन पुरवठा शृंखलाची कार्यक्षमता याची समितीला चौकशी करावी लागेल.
समितीला गोमेकॉमध्ये ऑक्सिजनच्या प्रशासनाच्या प्रक्रियेची तपासणी करावी लागेल आणि त्याचा कारभार सुधारणेसाठी शिफारस करावी लागेल.
“गोमेकॉ येथे ऑक्सिजन वितरणाच्या संपूर्ण साखळीत सुधारणा करण्याची शिफारस समिती करेल,” आदेशात म्हटले आहे
हे काम तीन दिवसांत पूर्ण करून सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत.
*घातपातचा शोध …*
तथापि, वरील संदर्भांखेरीज समितीला समस्या सोडविण्यासाठी व तोडगा काढण्यासाठी इतरत्रही लक्ष द्यायला हवे.
प्रारंभी आरोग्य सचिव डॉ. तारिक थॉमस, आय.ए.एस. कुणाल यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समिती आणि मेसर्स स्कूपचे प्रतिनिधी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑक्सिजन प्रवाहाची पाहणी केली असता त्यामध्ये काही मुख्य विसंगती आढळली.
“समितीला असे आढळले, की ऑक्सिजन पुरवठा पद्धत जुनी झाली आहे आणि त्याला आधुनिकीकरणाची आवश्यकता आहे. पहाटे 2 ते पहाटे 6च्या दरम्यानच्या काळतच ऑक्सिजन पुरवठा खंडीत कसा झाला हे समितीला समजू शकले नाही. ”असे तज्ज्ञ संघाशी जवळून काम करत असलेला एक अधिकारी म्हणाला.
घातपातबद्दल विचारले असता, अधिकारी म्हणाले, ऑक्सिजन साठवणची जागा मेडिसिन वॉर्डांपासून बरीच दूर असल्याने ते नाकारता येत नाही.
सूत्रांनी सांगितले की, ऑक्सिजन सिलिंडर्स पाइपलाइनच्या माध्यमातून फार पूर्वी सेंट्रल फार्मसीजवळ आणि दुसरे कोठेतरी यात्री निवास जवळ जोडले गेले आहेत. भल्या पहाटेच्या काही तासांत घातपात होण्याची शक्यता आहे.
*सुपर स्पेसिलिटी ब्लॉक सुरु होण्यास विलंब*
स्त्रोतांनुसार ऑगस्टमध्ये नवीन सुपर स्पेशलिटी ब्लॉक ‘पीपीपी ‘ पद्धतीने सुरू करण्याच्या सर्व योजना आखण्यात आल्या होत्या. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे यास उशीर झाला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी हेच घडले.जेव्हा कोरोनासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे उदघाटन लांबणीवर पडले. यामागे पीपीपी’ तत्ववरील खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरु न झाल्याने त्यावेळेस असंख्य मृत्यू झाले. नवीन सुपर स्पेशॅलिटी ब्लॉक सुरू करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक संथपणा हे असंख्य मृत्यूंना कारणीभूत ठरते.
“जर गोव्याला मृत्यूवर ताबा मिळवायचा असेल तर सर्व कोविड प्रकरणे त्वरित सुपर स्पेशलिटी ब्लॉकमध्ये हलवाव्यात.या ब्लॉकमध्ये
मध्यरात्री ऑक्सिजनच्या दाबामध्ये फरक पडत नाही. हाच त्वरित तोडगा आहे. यामुळे गोमेकॉ कोविड नसलेल्या रूग्णांसाठी त्वरित उपलब्ध होईल.”असे तज्ज्ञांना वाटते.
*कोविड नसलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे काय?*
सध्या गोमेकॉतील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची मोजदाद केली जात असली तरी कोरोनाची बाधा नसलेल्या मृत्यूची कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही.
ज्यांच्या शस्त्रक्रिया आणि उपचारांमध्ये कोविडमुळे विलंब किंवा व्यत्यय आला आहे?. यामुळे त्याचा मृत्यूचीही चौकशी होणे गरजेचं असल्याचे एका डॉक्टरने मत व्यक्त करताना विचार मांडले.
*अनुत्तरीत प्रश्न…*
#गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनच्या आवश्यकतेचा अंदाज कोण तयार करत आहे?
#मेसर्स स्कूप इंडस्ट्रीजशी संबंधित असलेल्या फायलींवर काम करणारा अधिकारी कोण आहे? त्यांची बिले कोण प्रमाणित करते?
#हे सिलिंडर घेण्यास कोण जबाबदार आहे आणि दररोज पुरवठा किती वेळा होतो?
#सिलिंडर पूर्ण रिकामे आहे की नाही याची गुणवत्ता तपासणी कशी केली जाते?
# सिलिंडरचा पुरवठा कमी केल्याबद्दल नर्स व सिस्टरकडून तक्रारी आल्या आहेत का? त्यावर कोणती कारवाई केली?
#पुरवठादार मेसर्स स्कूपमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी व आपत्ती झाल्यास आवश्यक ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता होती?
# जेव्हा मेसर्स स्कूपमध्ये अशा संकटाच्या मागणी पुरवण्याची क्षमता नसते तेव्हा इतर पुरवठादारांना ओळखण्यासाठी का वेळेवर पाऊल उचलले गेले नाही?
#शेवटच्या लाटेच्या वेळी हे स्पष्ट झाले होते,की मध्यम आणि गंभीर प्रकरणांमध्ये ऑक्सिजनला जास्त मागणी आहे, तर दुसऱ्या लाटेपूर्वी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वेळेवर पावले का उचलली गेली नाहीत?
#ऑक्सिजनची खरेदी, पुरवठा आणि तपासणी करण्यात वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाची काय भूमिका आहे?
#ऑक्सिजन खरेदी, वितरण आणि पुरवठ्याची संपूर्ण प्रक्रियेबद्दल अत्यंत गुप्तता का आहे?
# डिचोली मधील ज्या ‘स्टेप अप हॉस्पिटल’चे व्यवस्थापन भाजपा वैद्यकीय कक्षाच्या प्रमुखांकडून केले जाते, तिथे आवश्यकतेपेक्षा जास्त ऑक्सिजन कसा उपलब्ध आहे? परंतु राज्याच्या अग्रणी मेडिकल कॉलेज त्यापासून वंचित का आहे?
# जीएमसी लगतच्या सुपर स्पेशॅलिटी ब्लॉकमध्ये सतत उच्च प्रवाह ऑक्सिजनची आवश्यकता असते अशा गंभीर रूग्णांचे स्थानांतरण का केले जात नाही, ज्यात ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन ‘(एलएमओ) ची सोय असून ऑक्सिजनचा
नियमित प्रवाह मिळू शकेल?
# जनतेच्या हिताची अशी व्यवस्था थांबविण्यापूर्वी कोणत्या उच्च प्राधिकरणाला पूर्वकल्पना होती?
# डीनने न्यायालयात सादर केले की अशा गंभीर रूग्णांना नवीन ब्लॉकमध्ये हलविणे अत्यंत धोकादायक आहे, आणि आश्चर्यकारकपणे याच प्रकरणात आगाशी पोलिस ठाण्यात गुन्हेगारी तक्रारीनंतर दुसर्याच दिवशी डीन अशा रुग्णांना सुपर स्पेशलिटी ब्लॉकमध्ये हलविण्याची तयारी दर्शवतात . का?