पणजी -गोयंकारपण वृत्त
मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अंबादास हरिभाऊ जोशी यांनी शुक्रवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे गोव्याचे नवीन लोकायुक्त म्हणून शपथ घेतली.
महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवन, मुंबई येथून न्यायमूर्ती जोशी यांना पदाची शपथ दिली.
17 सप्टेंबर, २०२० रोजी न्यायमूर्ती (निवृत्त) के. के. मिश्रा यांच्या लोकांयुक्त म्हणून निवृत्तीनंतर सात महिन्यांहून अधिक काळ रिक्त असलेल्या पदासाठी राज्य सरकारने गेल्या महिन्यात त्यांचे नाव मान्य केले होते
न्यायमूर्ती जोशी यांनी जुलै 2014 ते जुलै 2019 या काळात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबईचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. यावर्षी जानेवारीत गोवा सरकारने गोवा लोकायुक्त कायद्यात दुरुस्ती केली होती. विरोधकांनी आरोप केला होता की सदर संस्था शक्तीहीन खुर्ची बनवली गेली आहे.