दाबोळी : गोयंकारपण वृत्त भारतीय नौदलाने राज्य सरकारला लसीकरण मोहिमेत मदत करण्यासाठी येथील दाबोळी रस्त्यावरील
नौदल सभागृहात (राजहंस थिएटर) लसीकरण केंद्र स्थापन केले आहे. रविवार वगळता सर्व दिवस सकाळी 9 ते 4 वाजता लसीकरण केंद्र कार्यरत असेल. लाभार्थी लोकांनी ‘कोव्हीन पोर्टल ‘ अथवा थेट येऊन नोंदणी करू शकतात. सध्या, लसीकरण वय 45 वर्षे आणि त्यावरील लोकांसाठी केवळ आहे.
याविषयी,पत्रकारांना सर्जन कमांडंट हरी म्हणाले,की नौदलाने गोव्यातील व खास करून दक्षिण गोव्यातील लोकांना लसीकरण करण्यासाठी हे केंद्र स्थापन केले आहे. मडगावातील रवींद्र भवन लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी यामुळे कमी होणार आहे. या केंद्रमध्ये 45हुन अधिक वयोगटातील लोकांना लस दिली जाणार असून सरकारच्या निर्देशांनुसार 18 वर्षावरील लोकांनाही लसीकरणचा लाभ दिला जाणार आहे .
या केंद्रामध्ये रांग व्यवस्थापन प्रणाली, लसीकरण व्यवस्थापन प्रणाली (दोन बूथ) क्षेत्र आणि
लसीकरण केल्यानंतर परीक्षणसाठी खोली ठेवण्यात आली आहे.दररोज सुमारे 500 लोक या केंद्रात लसीकरणासाठी समाऊ शकतात. सर्वसाधारणपणे वास्को आणि गोवाच्या सर्व लोकांसाठी या केंद्रात लस घेऊन कोरोविरुद्धच्या विरोधात लढाईत हातभार लावावा, असे त्यांनी आवाहन केले.