मडगाव: गोयंकारपण वृत्त
कोविड (साथीचा रोग) सर्व देशभर पसरला असताना त्याविरुद्धच्या लढ्यात पोलिस आघाडीवर आहेत. संसर्ग असलेल्या इमारती आणि रुग्णालयांच्या रक्षणापासून ते लॉकडाऊन आणि कर्फ्यू सुनिश्चित करण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात ते पुढे आहेत.
शत्रूचा सामना करत असताना पोलिस खंभीरपणे उभे आहेत का असा प्रश्न सर्वांना पडत आहे.
कोविडच्या तिसरी लाट पूर्वीपेक्षा भयानक येण्याची शक्यता असल्यामुळे संसर्ग होऊ नये म्हणून पोलिस कर्मचार्यांना त्यांचे दैनंदिन कर्तव्य बजावण्यास प्रशिक्षित करणे ही काळाची गरज होती.
यासाठी नुकतेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक सत्र आयोजित करण्यात आले होते.त्यात सर्व पोलिस अधिकारी आणि दक्षिण गोवा जिल्हा पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
गोमेकॉच्या ‘सुपर स्पेशलिटी ब्लॉक’चे प्रशासक डॉ. उदय काकोडकर यांनी उपस्थितांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. कर्मचार्यांना कोविडमध्ये मौल्यवान मार्गदर्शन केले . या कार्यक्रमत कोविड संसर्ग रोखण्याचे तंत्र, लसीकरण वापर, अन्य आजार -विकृती आणि त्याचे परिणाम इत्यादी अनेक विषयांचा समावेश होता. डॉ. उदय यांनी विस्तृत प्रश्नोत्तराच्या फेरीने सत्र संपवले ज्याचे सर्व कर्मचार्यांनी कौतुक केले.
कोविडचा सर्व देशभर असलेला प्रसार हा संपूर्ण पोलिस दलासाठी एक आव्हानात्मक काळ होता.पोलिस कर्मचार्यांना आपत्कालीन परिस्थितीशी सुरक्षितपणे सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढेल. त्यांनी दाखवलेल्या शौर्य व समर्पणाबद्दल आपल्याला संपूर्ण कर्मचार्यांचा अत्यंत अभिमान असल्याचे त्यांनी सांगितलं.या सत्रानंतर