वास्को:गोयंकरपण वृत्त
केंद्रीय संरक्षण मंत्रालया अंतर्गत असलेल्या
‘गोवा शिपयार्ड लिमिटेड’ (जीएसएल)तर्फे कोविड – 19 (साथीच्या रोगाचा) विरूद्ध लढा देण्याच्या कामात गोवा सरकारला मदत करण्यासाठी 100 लाख खर्चून ‘ऑनसाईट ऑक्सिजन प्लांट’ उपलब्ध केले आहे. प्रस्तावित ऑक्सिजन प्लांट प्रति मिनिट 960 लीटर वैद्यकीय ऑक्सिजन तयार करेल आणि ‘जीएसएल’द्वारे एका महिन्यात ते बांधून तयार केले जाईल, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
नाईक पुढे म्हणाले की,राज्याला ‘मेडिकल ऑक्सिजन’ची निकड लक्षात घेऊन गोवा शिपयार्ड लिमिटेड सुमारे 26 लाखचे 40 नग ‘ऑक्सिजन कन्सेन्टरेटर्स’ गोवा सरकारला प्रदान करत आहे. त्यापैकी चार नग यापूर्वीच गोव्यातील आरोग्य प्राधिकरणाकडे वितरित केले गेले आहे.
यामुळे कोरोना (साथीचा रोग)विरुद्ध गोवा सरकारच्या लढा मजबूत होईल.कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ‘जीएसएल’ च्या झुआरिनगर येथील युनिटमध्ये 25 खाटांचे विलगीकरण केंद्र तयार ठेवण्यात आले आहे, असे केंद्रीय मंत्री नाईक यांनी सांगितले.
Keep Reading
Add A Comment