पणजी :गोयंकारपण वृत्त
कोरोना रुग्णांच्या मृत्यूसाठी राज्य प्रशासन आणि गोवा वैद्यकीय महाविदयालय व हॉस्पिटलच (गोमेकॉ ) जबाबदार आहे, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने बुधवारी “आता बास,पुरे झालं ” असे कडाडले.
मध्यरात्री ते सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनाचे बळी पडत असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत, खंडपीठाने राज्य सरकार आणि गोमेकॉ यांना ‘आज’ आणि ‘उद्या’च्या रात्री कोव्हीड रुग्णांचा प्राणवायुच्या आभावामुळे मृत्यू होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोक मरण पावले तर कलम २१ चे पूर्णपणे उल्लंघन हॊत असल्याचे न्यायालयाने नमूद करून सांगितले की “आजची रात्र परीक्षा घेण्याची वेळ आहे.”
कोर्टाने सांगितले,की आम्ही मागील घटनाबद्दल पोस्टमॉर्टम करण्यासाठी किंवा,कोणास दोष देण्यासाठी येथे आलो नाही. आता कोणी मरणार नाही याला आमचे प्राधान्य असेल.
एकमेकांना दोष देण्याचा खेळ नंतर खेळला जाऊ शकतो.
कोरोना रूग्णांना आवश्यक असणारी ऑक्सिजन आणि त्याचा पुरवठा याविषयी तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात अपयशी ठरल्याबद्दल कोर्टाने गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना जोरदार फटकारले . त्यानंतर बुधवारी कोर्ट तहकूब होण्यापूर्वी, सुमारे अडीच तास चाललेल्या आभासी सुनावणीसाठी डीनला उपस्थित राहण्यास बजावले.
“बास म्हणजे बास! कधी प्राधिकरण म्हणते की तेथे पुरेशा ऑक्सिजन आहे,परंतु तेथे रिकाम्या सिलेंडर्स, ट्रॉली आणि परिवहन सारख्या लॉजिस्टिकल समस्या आहेत. आता जेव्हा काही अतिरिक्त रिकामे सिलिंडर उपलब्ध केले गेले , तर त्याच प्राधिकरणाने अतिरिक्त सिलिंडर्ससाठी पुरेसे ऑक्सिजनच उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. ”
गोमेकॉ चे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी तातडीने सुनावणीस हजेरी लावली. त्यांनी मान्य केले, की गोमेकॉमध्ये बेड व ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता आहे.
ते म्हणाले की 1000 कोविड रूग्णांसाठी फक्त 700 बेड आणि पाईप केलेल्या ऑक्सिजनद्वारे 160 रुग्ण तर 320 जण सिलिंडरवरील ऑक्सिजनवर आहेत.
डीनच्या वतीने उत्तर देताना गोमेकॉचे नोडल अधिकारी डॉ. खांडेपारकर यांनी हायकोर्टाला ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले, की काल कोविड रूग्णांसाठी 400 ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता होती. दुपारी 2 वाजेपर्यंत सिलिंडरची आवश्यकता 500 झाली होती .
ते म्हणाले की, ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू होणार नाही, यासाठी शासनाला आज दुपारी २ वाजेपर्यंत 500 जंबो ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करावी लागेल, आणखी 250 संध्याकाळी दहाच्याआत, तर पहाटे सहा पर्यंत आणखी 250 सिलिंडरची व्यवस्था करावी लागेल. तसेच, आज दुपारी 2 वाजल्या पासून पुढील 24 तास दर 20 मिनिटाला 80 ट्रॉलीची सोय व्हावी लागेल.
सकाळी २ ते 6 च्या दरम्यान मृत्यू कशाला होतात हे कोर्टाने डीन आणि नोडल अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.त्यावर डीनने उत्तर दिले,की पाईप ऑक्सिजन घेतलेले रुग्ण अधिक गंभीर असतात आणि त्यांना सतत ऑक्सिजनची आवश्यकता असते.गोमेकॉकडे ‘एचएफएनओ’ यंत्रे असले तरी भरपूर ऑक्सिजन खात असल्याने त्याचा वापर केला जात नाही
यावेळी , ‘एचएफएनओ’ न वापरल्याबद्दल हायकोर्टाने डीनवर जोरदार हल्ला चढविला.ते म्हणाले, की जर रूग्णांना त्याची गरज भासली असेल, तर रुग्णालय ती नाकारू शकत नाही.
दरम्यान, “तुम्ही सर्व हिप्पोक्रॅटिक शपथ घेऊन काम करत आहात.आपण कर्तव्याच्या आवाक्याबाहेरही काम करत आहे. राज्यासाठीआपण बरेच काही केले आहे”, या शब्दात वैद्यकीय सेवेतील बंधुत्वाच्या कार्याचे कोर्टाने कौतुक केले.
‘ रोटरी क्लब, स्वयंसेवी संस्था,स्वयंसेवकांनी
लोकांचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कोर्टाने प्रशांसा केली. तसेच इतर स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले की शक्य असल्यास ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन द्यावेत.