पणजी -गोयंकारपण वृत्त
गोव्यात रोगप्रतिबंधक उपचारासाठी (प्रॉफीलेक्सीस ) ‘इव्हार्मेक्टिन ‘१२ मिलीग्रामच्या गोळ्या कोणाच्या सांगण्यावरून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोमंतकी्यांना देण्यास सांगितले आहेत? त्यानां पंतप्रधान कार्यालय वा आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली का? जागतिक आरोग्य संघटनेने सदर उपचार मंजूर केले आहेत का? ‘ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चे मत घेतले आहे का? , या सर्व प्रश्नांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी गोवा प्रदेश कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
चोडणकर म्हणाले, की
क्लिनिकल चाचण्यांमध्ये ‘इव्हर्मेक्टिन’चा वापर फक्त कोविड -19वरील उपचारावरच केला जाऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने सल्ला दिला आहे का? ‘डब्ल्यूएचओ’च्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे. आता प्रश्न पडतो की या रोगप्रतिबंधक उपचाराचा निर्णय घेण्यासाठी आरोग्यमंत्री यांना अधिकार कोणी दिले ?. गोव्यातील जनतेला भाजपा सरकारने हे समजावून सांगितले पाहिजे.
सदर उपचार भारत किंवा अन्य जगात कोठेही दिला जातो का, यांची माहिती भाजपा सरकारने सार्वजनिक करण्याची मागणी गिरीश चोडणकर यांनी केली.आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोविड विरूद्ध प्रतिबंधक औषध म्हणून गोव्यातील लोकांना ‘इव्हर्मेक्टिन ’12 मिलीग्राम गोळ्या उपलब्ध करुन देण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त केली.
गिरीश चोडणकर यांनी “मेकिंग बिझिनेस फ्रॉम पीपलस सिकनेस “च्या माध्यमातून आरोग्य मंत्र्यांचे हे आणखी एक कार्य आहे का?.आमची अशी तीव्र भावना आहे की रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या या नवीन अभियान, प्रतिबंधात्मक उपचारांचे पैसे भाजपाच्या कमाईसाठी सुरू केले जातात. लोकांच्या आजारपणापासूनही पैसे कमविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या या सरकारवरील लोकांचा विश्वास गमावला आहे.आरोग्यमंत्री आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या घोषणांना बळी न पडण्याचे आपण आवाहन करतो. कोणत्याही कोविड उपचारासाठी शास्त्रीय पुरावे आणि अधिकृत संस्थांकडून मान्यता मिळाल्या पाहिजेत जेणेकरुन गोमंतकीय पुढे येऊन औषधे स्वीकारू शकतील, असे चोडणकर
यांनी सांगितले.