मडगाव:गोयंकारपण वृत्त
ऑक्सिजन टँकरची गळती पाईपला तडा गेल्यामुळे झाली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.तसेच,नवीन ऑक्सिजन प्लांटला कंप्रेसर मिळाला नाही म्हणून उशीर झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंत यांनी बुधवारी दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयाला भेट दिली. त्यांनी प्रथम ऑक्सिजन टाकीला भेट देऊन काल झालेल्या गळतीचा तपशील घेतला.
त्यांच्यासमवेत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कट्याल, आयएएस आणि एसजीडीएचचे अन्य कर्मचारी होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की पाईपमध्ये असलेला एक छोटासा तडा विकसित झाला आहे, ज्याची दुरुस्ती केली जात आहे
ऑक्सिजन प्लांट कधी सुरू होईल, असे विचारले असता ते म्हणाले, “एकदा कॉम्प्रेसर आल्यावर ते कार्यरत होईल आम्ही कॉम्प्रेसरची वाट पाहत आहोत.”
नंतर मुख्यमंत्र्यांनी कोविड वॉर्डमधल्या रूग्णांची भेट घेतली.पत्रकारांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांनी संपूर्ण दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला आहे.आमचे डॉक्टर आणि कर्मचारी खूप चांगले काम करत आहेत अगदी खाजगी डॉक्टरही मदत करतात. आम्ही हॉस्पिटलची खाठांची क्षमता 550 पर्यंत नेली आहे. दररोज बरे झालेल्या सुमारे 100 रूग्णांना सुट्टी देण्यात येत आहे, ”
सावंत पुढे म्हणाले की,कोरोना बधित उशीरा प्रवेश घेत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
कोविड बाधित बहुतेक रुग्ण उशीरा येतात. जर फुफ्फुसांचे नुकसान झाले असेल तर सामान्य स्थितीत परत आणणे फारच अवघड आहे. बहुतेक मृत्यू शेवटच्या टप्प्यात दाखल झालेल्या रूग्णांमुळे होत आहेत. ”
त्यांनी लोकांना चाचणी करून लवकरात लवकर उपचार सुरू करण्याचे आवाहन केले.
“ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास तातडीने एका ‘स्टेप अप ‘रुग्णालयात दाखल झाल्यास बरे होण्यास मदत होईल.
त्यांनी फार्मेसिना ‘पॅरासिटामल्स’ लिहून न देण्याचे आवाहन केले. तसेच रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) किंवा एसएचसी येथे जाऊन तपासणी करण्याचा सल्ला दिला.