कळगुट :गोयंकारपण वृत्त
प्राथमिक आरोग्य केंद्र, कांदोलीच्या सहकार्याने कलंगूट ग्रामपंचायती lतर्फे कोरोना रुग्णांना मदत आणि ‘डेटा एन्ट्री’साठी प्रशिक्षण देण्यासाठी ‘ऑनलाइन’ प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले.
या विषयी माहिती देताना कळगुटचे सरपंच शॉन मार्टिन्स म्हणाले की, कळगुट या गावात सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिचारिका व डॉक्टरांना प्रत्येकाला सपंर्क साधणे खूप कठीण होत आहे.यासाठी आमच्या ग्रामस्थांनी गावातील सर्व कोरोना पॉझिटिव्ह गरुग्णांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आमच्या सर्व पंच सदस्यांनी – चेरिल पिमेना ई लोबो, रुपा चानू चोडणकर, सुदेश मयेकर, अँथनी मेनेझिस, पूजा मटकर, गॅब्रियल फर्नांडिस, फ्रान्सिस रॉड्रिग, ज्योत्स्ना परुळेकर, दिनेश शिमेपुरुषकर, सालुझिनहो फर्नांडिस तसेच आमचे झेडपी सदस्य यांनी रुग्णांचा मागोवा ठेवण्यासाठी मदत केली.
सरपंच म्हणाले, की दत्तप्रसाद दाभोलकर यांच्याकडून रुग्णाच्या घराच्या दारात ‘होम आयसोलेशन किट’ देण्याची व्यवस्था केली जात आहे. आरोग्य अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी पंचायतीला सांगितले आहे, की नियमितपणे आणि पद्धतशीरपणे दररोज घरात अलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांचा आढावा घेणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला योग्य क्षणी माहिती देणे म्हणजे एखाद्याचा जीव वाचविणे आहे.
“उद्यापासून आमचे सर्व स्वयंसेवक आमच्या रूग्णांना कॉल करुन तपासणी करण्यास सुरुवात करतील,”असे ते म्हणाले.