पणजी:गोयंकारपण वृत्त
‘ डीडीएसएसवाय’ योजनेंतर्गत कोविडवरील उपचाराचा समावेश झाल्यानंतर, राज्य सरकारने या योजनेचा लाभ राज्यत विमा नसणाऱ्या आणि कालबाह्य झालेल्यां ‘डीडीएसवाय’ कार्डधारकांना देखील आपसूक नूतनीकरण करून या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.
या विषयी माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “जे लोक अद्याप ‘डीडीएसएसवाय’ योजनेसाठी अर्ज सादर करू शकले नाही,त्यांनीही शासकीय रूग्णालयात मोफत उपचार घेण्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात,” मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, की सर्व ‘डीडीएसएसवाय’ कार्डांचे नूतनीकरण लाभार्थ्यांनी खर्च न करता ते विनाशुल्क केले जाईल. लाभार्थ्यांनाही नूतनीकरणासाठी आरोग्य केंद्रांना भेट देण्याची गरज नाही. या योजनेचा गोव्यातील अडीच लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ मिळणार आहे.
या अधिसूचनेत म्हटले आहे, की कोविड रूग्णांना सर्वसाधारण वॉर्डसाठी दिवसाला 8००० रुपये आणि योजनेंतर्गत व्हेंटिलेटर असलेल्या ‘आयसीयू’ सुविधांसाठी दिवसाला 19,२०० रुपये शुल्क आकारले जाईल.
‘डीडीएसएसवाय’ पॅकेजमध्ये प्रवेश शुल्क, प्राथमिक व तज्ञ सल्लागार शुल्क, बेड शुल्क, नर्सिंग शुल्क, आहार, कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, एक्स-रे, ईसीजी तसेच इतर चाचण्या, वैद्यकीय उपकरणे आणि औषधे यांचा समावेश असेल.
तथापि, सरकारने या पॅकेजमध्ये डायग्नोस्टिक हस्तक्षेप, विशेष औषधे, विशेष उपकरणांचा वापर, इतर विशेष प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया आणि आयसीयू व्यतिरिक्त अतिरिक्त ऑक्सिजन प्रवाह समाविष्ट होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
“दावा केल्यापासून प्रवेशाच्या तारखेपासून जास्तीत जास्त 10 दिवस प्रतिबंधित असेल. दर दिवसाचे शुल्क प्रवेशाच्या तारखेपासून 24 तासांच्या आधारे मोजले जाईल, कोणत्याही वेळी 6 तासांपेक्षा कमी कालावधी दुर्लक्ष केला जाईल.कोविड उपचाराची योजना फक्त ‘आयसीयू’ सुविधा असलेल्या ‘डीडीएसएसवाय’ प्रामाणित रूग्णालयात लागू होईल.