मडगाव :गोयंकारपण वृत्त
वाढत्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूमुळे ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालय’ (गोमेकॉ ) वादळाच्या भोवऱ्यात सापडले आहे. परंतु त्यापेक्षा दुर्लक्ष केले जात असलेल्या दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे सरकारी डॉक्टरांचे म्हणणे आहे.
“प्रत्येकजण गोमेकॉ मधील परिस्थितीबद्दल बोलत असताना मी सांगू इच्छितो की दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात स्थिती अजूनही वाईट आहे. आमच्याकडे स्वतःचा ‘ऑक्सिजन कन्सेन्टरेटर प्रकल्प ‘असूनही तो गळतीस लागला तेव्हा मध्यरात्री आम्हाला अचानक रुग्णांना असलेल्या मध्यवर्ती पाईपच्या ऑक्सिजनचा दाब कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिणामी अनेकजण थेट मरण पावले, ”असे नाव न घेता काही डॉक्टरांनी आरोप केले.
ते पुढे म्हणाले,की ऑक्सिजनचा वापर कोरोनासाठी चांगला नाही.
मात्र,हाच आधार आहे ज्यावर आपण आपले उपचार बनवितो, गेल्या काही महिन्यांपासून आम्ही आपल्या उपचारांवर योग्य भर न घेता कार्यरत आहोत.” एखाद्या रुग्णालयाचा दर्जा केवळ रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रमाणातच मोजली जात नाही. आम्हाला रूग्णांवर उपचार करण्यासाठी औषधे, मलम, लिनेमेंट्स आणि बरीच उपकरणे आवश्यक आहेत. ऑक्सिजनचा पुरवठादेखील ही एक समस्या असली तरी इतर अन्य सर्व गोष्टींच्या पुरवठ्याबद्दलही तीच अधोगती आहे , “ते म्हणाले.
डॉक्टर पुढे म्हणाले की, मूत्रमार्गात ‘कॅथेटर’ वापरण्यापूर्वी वंगण घालणे आवश्यक आहे, परंतु आमच्याकडे वंगणचा साठाच नाही.संपूर्ण इस्पितळात कोणतेही वंगण नाही. म्हणून आम्हाला कॅथेटरस कोणत्याही वंगणशिवाय घालण्यासाठी सक्ती करावी लागते. हे रुग्णांचे छळ करण्या सारखेच आहे परंतु आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. आम्हाला हे करण्यास भाग पाडले जाते. मला असे वाटत नाही की जेव्हा माझ्या रूग्णांवर खूप वेदना सोसाव्या लागतात तेव्हा मी स्वत: ला डॉक्टर म्हणू शकतो … परंतु मी स्वत: ला बजावतो की मी त्यांच्या मदतीसाठी हे करीत आहे, त्यांचे स्वतःचे चांगले होण्यासाठीच आहे . आणि मी त्यांना ओरडण्यापासून रोखत आहे, ”तो म्हणाला.
‘एसजीडीएच’ येथे ज्यांना वात वा आकडी येते, अशा रूग्णांवर उपचार करण्यासाठी आमच्याकडे औषधे नाहीत. जर एखाद्याला आकडी येत असेल तर आपण फक्त त्यांनां एका बाजूने वळवतो आणि त्यांच्या चांगल्यासाठी आशा बाळगतो . ”
“ एक रोगी ज्याला आकडी आली व तो आक्रमक झाला. आकडीमुळे त्याने आपल्या शरीरावरील ताबा गमावला आणि एक मास्क चुकून फोडून टाकला.आधीच मास्कचा कमी पुरवठा होतो . आम्ही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण परिणामकारक औषधाशिवाय हे व्यर्थ ठरत आहे, ”ते म्हणाले .
“ दररोज आमच्या समोर अनेक रुग्ण मरतात मात्र आम्ही असहाय आहोत. जेव्हा त्यांचे नातेवाईक आमचा तोंडी आणि शारीरिक अपमान करतात तेव्हाही आम्ही असहाय होतो. कृपया आम्हाला मदत करा. ”अशी विनवणी डॉक्टरने केली.
1
/
9
#JustCasual With Chirag Naik | “MARGAO IS ALREADY ON VENTILATOR”
#JustCasual With Francis Coelho | “Different Names to Finish Goa – 16B, 17(2) & 38(A)”
#JustCasual With Sanket Bhandari | “Govt Forced Us to Protest in Assembly”
#JustCasual With Sadanand Shet Tanavade | “Special Status Not Possible for Goa”
#JustCasual With Utpal Parrikar | “Ready To Align With Like-Minded People For CCP”
#JustCasual With Yuri Alemao | FROM COCKPIT TO ASSEMBLY FLOOR, Yuri Alemao’s TURBULENT life
1
/
9






