पणजी -गोयंकारपण वृत्त
आरोग्य विभाग आणि ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील’ (गोमेकॉ ) कारभाराची ची ‘सीबीआय’ चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करणार असल्याचे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज सांगितले.
कोविड मृत्यूच्या वाढत्या संख्येसाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि आरोग्य विभागालाही जबाबदार धरत बाबूंश म्हणाले, “मी गोमेकॉ आणि आरोग्य विभागाची सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करेन. गोमेकॉमध्ये वाढत्या मृत्यूसाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि त्यांचे विभाग पूर्णपणे जबाबदार आहेत, ”
बाबूश पुढे म्हणाले की, आरोग्यमंत्री विश्वजित राणे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत आणि म्हणूनच मुख्यमंत्री सावंत यांनी आरोग्य खात्याचा ताबा घ्यावा.कोविड परिस्थिती गंभीर होत चालली आहे आणि गोमेकॉ संदर्भात सीबीआय चौकशी व्हायला हवी, गोमंतकीय कुटुंबे आपला प्रियजनांना गमवल्याबद्दल दुःखी आहेत,” ते म्हणाले, की कोविड च्या दुसर्या लाटेचा धोका माहित असूनही, आरोग्य विभाग बेपर्वा राहिला आहे. त्यामुळेच कोरोना मृत्यूच्या बाबतीत गोवा देशात अग्रेसर आहे.
“आम्ही कोविड विषाणूची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळण्यास सक्षम नाही.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या सर्व गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी एका खांबावरून दुसऱ्या खांबाकडे धावताना दिसत आहेत,” असे मॉन्सरात म्हणाले.