पणजी :गोयंकारपण वृत्त
राज्यातील टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्यास वारंवार उशीर केल्याबद्दल राज्य सरकारला येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने फटकारले. येत्या 15 दिवसांच्या आत ही प्रक्रिया सुरू करण्याची सरकारला आणखी एक संधी खंडपिठाने दिली आहे.
खंडपिठाने आपल्या आदेशात नमूद केले आहे,
“या अवमान याचिकेवर पुढील कार्यवाही करण्यापूर्वी आम्ही राज्य सरकारला टॅक्सीमध्ये डिजिटल मीटर बसविण्याची प्रक्रिया लवकरात लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत आजपासून 15 दिवसांच्या आत सुरू करण्याची आणखी एक संधी देत आहे .” ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा’ द्वारे (टीटीएजी ) राज्य सरकारविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेतील अंतरिम आदेश देताना खंडपिठ
म्हणाले.
14 जूनपर्यंत या प्रकरणाची सुनावणी तहकुब ठेवत कोर्टाने म्हटले आहे की, “आमच्या मते टॅक्सीमध्ये डिजिटल मीटर बसविण्याचे हे काम केवळ आपल्याद्वारे जारी केलेल्या निर्देशानुसारच नव्हे तर अवमान कार्यवाहीत देण्यात आलेल्या आश्वासनांच्या बाबतीतही पूर्ण झाले असावे.” .
शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, अॅडव्होकेट जनरल पांगम यांनी सांगितले, की राज्य सरकार टॅक्सीमध्ये डिजिटल मीटर बसविण्यास उत्सुक असून आम्ही सर्वतो प्रयत्न करत आहोत.प्रत्यक्षात 1 मे 2021 पासून असे मीटर बसविण्याचा प्रस्ताव होता.
युक्तिवाद करताना अॅडव्होकेट जनरल म्हणाले,की कोरोना (साथीचा रोग) सर्व देशभर पसरला असल्याने परिस्थितीमुळे काही अडचणी उद्भवल्या आहेत. राज्य सरकारकडे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा नोडल अधिकारी यांचे निधन झाले आहे.म्हणूनच त्यांना विलंब होत आहे. ”
टॅक्सींमध्ये डिजिटल मीटर बसविण्याच्या मुद्यावर वेळोवेळी करण्यात आलेल्या कोर्टाच्या आदेशांचे, एका कारणासाठी किंवा दुसर्या कारणाने पालन केले जात नसल्याबद्दल खंडपीठ असमाधानी आहेत.
“5 जुलै 2019 च्या आमच्या आदेशानुसार या संदर्भात काही दिशानिर्देश जारी केले गेले होते त्याचे पालन केले नाही. त्यानंतर याचिकाकर्त्यांची अवमान याचीका २० जानेवारी २०२० रोजी आमच्याकडून निकाली काढण्यात आली होती. या अवमान याचिकेतही आम्ही निदर्शनास आणून दिले होते की सरकार या न्यायालयाचा अवमान करत आहेत . तथापि, विद्वान ऍडव्होकेट जनरल यांनी असे निवेदन दिले होते की भाड्याच्या दराबाबत अधिसूचना राज्य सरकारने 15 दिवसांच्या कालावधीत,म्हणजे फेब्रुवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाईल, असे नमूद केले होते.निवेदनात म्हटले आहे की लवकरच ही अधिसूचना जारी करून टॅक्सींमध्ये डिजिटल मीटर बसविणे सुरू होईल. वरील विधानानंतरही, भाडे दराबाबत अधिसूचना फक्त 14 जानेवारी 2021 रोजीच,म्हणजेच जवळपास एक वर्षाच्या उशीरानंतर
काढण्यात आली, असे ताशेरे कोर्टाने मारले आहे.
“पुढे, हे अधिसूचनाh दिल्यानंतरही टॅक्सीमध्ये डिजिटल मीटर बसविण्याबाबत काहीच पावले उचलली गेली नाहीत,” असेही त्या पुढे नमूद केले.