मडगाव :गोयंकारपण वृत्त
ऑक्सिजनची वाढती मागणी आणि द्रव गॅसच्या कमतरतेमुळे होत असलेल्या अनेक मृत्यूची दखल घेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, काही दिवसांत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होईल. “ऑक्सिजनच्या पुरवठयात वाढ होण्यासाठी आपण आधीच केंद्र आणि उत्पादकांच्या संपर्कात आहे. त्याशिवाय गोवा वैद्धकीय महाविद्यालय (गोमेकॉ ) आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात 15 मेपूर्वी हे दोन प्रकल्प सुरू होतील, अशी आमची अपेक्षा आहे.
यामुळे गोव्यातील ऑक्सिजनची कमतरता आणखी कमी होईल”, मुख्यमंत्री म्हणाले, की
5 हजार लीटर क्षमतेचे ऑक्सिजन टँक आता दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात (एसजीडीएच) स्थिर पुरवठा करीत आहे. ‘पीएसए ऑक्सिजन’ प्लांट प्रति मिनिट 600 लिटर 15 मे 2021 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
‘एसजीडीएच’ प्लांटमध्ये सर्व उपकरणे आली असल्यामुळे प्रथम पुरवठा सुरू होऊ शकतो ,आणि तंत्रज्ञ आता केवळ फिल्टरची प्रतीक्षा करीत आहेत.मूळ यंत्रणा तयार आहे आणि एकदा फिल्टर आल्यानंतर हा प्लांट स्थापित करुन कार्यान्वित होईल,” असे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे ते म्हणाले, की गोवा मेडिकल कॉलेजमधील सुपर स्पेशॅलिटी ब्लॉक गुरुवारी कार्यान्वित होत आहे.या सुविधेत २०,००० लिटर ऑक्सिजन टाकी बसवण्यात आली आहे. सुरुवातीला कोरोना रूग्णांसाठी 150 ऑक्सिजन बेडचा वापर केला जाईल आणि आवश्यकतेनुसार ते वाढवले जाईल.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की मागणी वाढत असताना आम्ही आमच्या साधन सुविधांत निरंतर सुधारणा करीत आहोत.
ऑक्सिजन पुरवठा करणार्यांच्या वादावर ते म्हणाले, “आता या प्रकरणात जाण्याची वेळ नाही. जर कुणी चुकलं असेल तर परिस्थिती सामान्य झाल्यास त्याकडे लक्ष देण्यास आपल्याकडे पुरेसा वेळ असेल. ”