पणजी -गोयंकारपण वृत्त
ऑक्सिजन पुरवठय़ाच्या कमतरतेच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन राज्यातील डॉक्टरांची महत्वाची संघटना असलेल्या ‘गार्ड’ने राज्य सरकारकडे केले आहे.
‘गार्ड’ने पाठवलेल्या पत्रकात म्हटले आहे ,”आम्ही सरकारला आवाहन करतो की ऑक्सिजन पुरवठय़ाच्या कमतरतेच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी.पर्वरी येथील सचिवालयात मंगळवार ४ मे रोजी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासमवेत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यात आम्ही अधिक आरोग्य कर्मचाऱ्याची गरज, ऑक्सिजन पुरवठ्याचा तुटवडा आणि अन्य लॉजिस्टिक मुद्द्यांबाबत आपले मुद्दे मांडले .
‘गार्ड’ने म्हटले आहे की “कोविड साथीच्या दुसऱ्या लाटेत रुग्णाचे प्रमाण वाढले आहे. महामारीची साथ आणि मृत्यूचे वाढत्या प्रमाणसमोर अस्तित्वात असलेल्या सुविधांच्या नियंत्रणाबाहेर गेले आहे.आरोग्य सेवा व सुविधांच्या मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे सर्व उपलब्ध स्त्रोत कमी झाले आहेत.”
दरम्यान, ‘गार्ड’ने लोकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, वैयक्तिक लॉकडाउनची निवड करणे, स्वतः लसीकरण करणे आणि आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
Keep Reading
Add A Comment