Share Facebook Twitter LinkedIn Pinterest Email पणजी -गोयंकारपण वृत्त गोव्यातील लॉकडाऊनसाठी भाजपा आमदारांनी केलेल्या सुचनेवर राज्य सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सांगितले. मुख्यमंत्री सावंत यांच्यासमवेत गुरुवारी झालेल्या आभासी बैठकीत भाजपच्या सर्व आमदारांनी कोविड प्रकरणांची वाढती संख्या रोखण्यासाठी लवकरात लवकर राज्यात लॉकडाउन लागू करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. या विषयी मुख्यमंत्री म्हणाले, “या संदर्भातील सर्व घटकांशी आणि कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेण्यात येईल.आपण सर्व आमदारांना पुढे येऊन ‘कोविड वॉर रूम’ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत” या बैठकीत उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री चंदकांत कवळेकर म्हणाले, की सार्वजनिक संचाराला आळा घालण्यासाठी सरकारने निर्बंध घालून देखील संक्रमणाची वाढती संख्या रोखण्यात यश आलेले नाही.यामुळे लॉकडाउन लागू करणे हे सरकारपुढे एक पुढचे पाऊल असू शकते. आम्ही लॉकडाऊन बद्दल (बैठकीत) चर्चा केली. आपण म्हटले आहे की ज्याप्रकारे कोरोना प्रकरणात वाढ झाली आहे, त्यामुळे आपल्याला आणखी एक लॉकडाउन लागू करावे लागेल. “मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाचे मत जाणून घेतले आणि लॉकडाऊनसाठी सर्व आमदारांचे एकमत झाले, ”कवळेकर म्हणाले.