वास्कोःगोयंकारपण वृत्त
वास्को मतदारसंघात वाढते कोविड मृत्यू कोळसा प्रदूषणामुळे होत आहेत काय, असा सवाल भाजपचे वास्कोचे आमदार कार्लोस अल्मेदा यांनी मंगळवारी केला.
अल्मेदा यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्यासोबत मतदारसंघातील कोविड परिस्थितीबाबत संयुक्त बैठक घेतली.
बैठकीनंतर अल्मेदा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की वास्कोमधील वाढते कोविड मृत्यू कोळसा प्रदूषणाशी जोडले गेले आहेत ज्यामुळे वास्कोवसियच्या फुफ्फुसांचे नुकसान झाले आहे.
रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी शासनाशी बोलण्याचे आश्वासन देताना, चिखली उपजिल्हा रुग्णालयासाठी अतिरिक्त कर्मचार्यांची मागणीही आमदारांनी केली.
चिखलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे
डॉ. अनिल उमरस्कर म्हणाले की, बैठकीत काही विषयावर चर्चा करण्यात आली असून काही निवेदन देण्यात आले आहेत.तसेच उपजिल्हाधिकाऱ्यासह आमदार कार्लोस अल्मेदा यांनी सर्व मदतीचे आश्वासन दिले.
दरम्यान, उपजिल्हाधिकारी सचिन देसाई म्हणाले की कोविड हाताळताना आरोग्य अधिकार्यांना भेडसावणाऱ्या काही बाबींचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती आणि चिखली रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त कर्मचार्यांची आवश्यकता यासारख्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले .