पणजी :गोयंकारपण वृत्त
गोवा विद्यापीठअंतर्गत सर्व महाविद्यालयांना 16 जून 2021 च्या आधी ऑफलाइन परीक्षा घेऊ नये असा आदेश दिला आहे.
“ऑफलाइन परीक्षा 16 जून 2021 पूर्वी घेण्यात येणार नाहीत. विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन आठवड्यांची नोटीस दिली जाईल,” विद्यापीठाने म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले,की अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प / प्रबंध निवेदन सादर करण्याची अंतिम तारीख १ जून २०२१ असेल.
“प्रोजेक्ट्स / प्रबंध निबंधकाद्वारे विद्यार्थ्यांना सॉफ्ट कॉपी स्वरुपात सादर केले जातील. व्हायवा ऑनलाईन पद्धतीने काटेकोरपणे घेण्यात येईल ज्यामध्ये विद्यार्थी, मार्गदर्शक आणि बाह्य परीक्षक यांच्यात शारीरिक अंतर राहणार आहे .”
दरम्यान, संबधीत महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यापीठ शिक्षण विभागातील संबंधित प्रमुखांना या परिपत्रकामधील माहिती संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याची विनंती केली गेली आहे .