काणकोण :गोयंकारपण वृत्त
गेल्या सोमवारपासून तालुक्यात स्वेच्छेने लॉकडाउन लादले असतानाही काणकोण येथे दररोज पॉझिटिव्ह आढळणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये कोणतीही घट दिसून आलेली नाही. गेल्या पंधरवड्यापासून दररोज 70 ते 80 च्या घरात रुग्ण सापडतआहेत.
कोविड -19च्या चाचणीत आठ दिवसांच्या मुलाची चाचणी पॉझिटिव्ह सापडली आहे . शुक्रवारी चावडी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात आणण्यापूर्वी एका व्यक्तीचा कोरोना विषाणूने बळी घेतला.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी जाहीर केले की, रविवारी सकाळपासून राज्यात कर्फ्यू लागणार आहे. शुक्रवारपासून शेकडो स्थानिकांनी तालुक्यातील व्यापारी व प्रशासकीय राजधानी चावडीला गर्दी केली होती.
संबंधित नागरिकांकडून, कोविड -19च्या ‘एसओपी’च्या उल्लंघनाची तक्रार मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी सकाळी आवश्यक वस्तू विक्री करणार्या बहुतेक दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले आणि सामाजिक दूरीच्या नियमांचे पालन करून सायंकाळी त्यांना उघडण्यास परवानगी देण्यात आली.
शुक्रवारी सकाळी उघडल्या गेलेल्या घाऊक विक्री करणारी दारूची दुकानांना पोलिसांनी दुपारपर्यंत आपले शटर खाली करण्यास सांगितले.
संतापलेल्या वाईन स्टोअरच्या घाऊक विक्रेत्याने विचारले, की मडगावमधील त्यांच्या व्यवसाय बंधूना आपली दुकाने कशी उघडता आली ? गोव्यात वेगवेगळ्या शहरांत वेगळे नियम पाळत आहेत का?,असा आपला राग व्यक्त केला.
“जेव्हा मी पोलिस कॉन्स्टेबलने माझे दुकान बंद करण्यास सांगितले तेव्हा सरकारी पत्रक दाखवण्यास सांगितले.त्याने काणकोण पोलिस निरीक्षकांनी तसे करण्यास सांगितले असून आधी दुकान बंद करा व नंतर साहेबाना विचारणा करण्याचे उत्तर दिले .” त्याने सांगितले.
जेव्हा या बातमीकर्त्याने काणकोण पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांना त्यासंदर्भात परिपत्रक दाखवण्यास सांगितले.तेव्हा त्यांनी सांगितले की पीआय पोळे गेटकडे गेले असून त्यांच्याकडे कोणतेही परिपत्रक नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, वाढत्या कोरोना प्रकरणाची वाढती संख्या आणि ती रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत आढावा घेण्यासाठी शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी शनिवारी सकाळी बैठक घेतली.या बैठकीत स्थानिक आमदार व उपसभापती इजिदोर फर्नांडिस, उपजिल्हाधिकारी, मामलत दार, पोलिस निरीक्षक, अग्निशमन दलाचे प्रमुख ,काणकोण नगरपालिका अध्यक्ष सायमन रिबेलो, इतर सर्व नगरसेवक, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दिओगो दा सिल्वा, उपाध्यक्ष अनिल भगत, भाजप मंडळाचे अध्यक्ष नंददीप भगत आणि माजी नगराध्यक्ष अजय भगत उपस्थित होते.
उपस्थित असलेल्या सर्वांनी रविवारी गोवा सरकारने लागू केलेले 15 दिवसाच्या कर्फ्यू निर्बंध गरज असल्याचे जोर दिला. तालुक्यातील कोविड प्रकरणांची साखळी तोडण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे सर्वांचे एकमत झाले
शनिवारी सकाळी १० च्या सुमारास जवळजवळ शंभर लोक कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये स्वत: ची चाचणी घेण्यासाठी कडक उन्हात वाट पाहत होते. चाचणी परीक्षेच्या शेजारी एक शमियांना उभारला गेला असला तरी इतक्या मोठ्या संख्येने लोकांना सामावून घेण्यासाठी तो फारच लहान आहे. सकाळी 9.00 वाजल्यापासून मी थांबलो असल्याचे एकट्याने सांगितले.
तो म्हणाला , “चाचणीसाठी येथे येणार्या प्रत्येकाच्या अंगात कोविडची लक्षणे दिसतात,आणि कडक उन्हात रांगेत उभे राहणे कठीण होत आहे, अधिकाऱ्यांना चाचणी केंद्र अधिक चांगल्या ठिकाणी हलवावी लागेल,”
दरम्यान, काणकोण नगरपालिका क्षेत्रात आज 45 ताजी प्रकरणे आढळून आल्यामुळे, मागील पंधरवड्यापासून पालिका क्षेत्रत कोरोनाचा दरारा कायम आहे, अशी माहिती सामुदायिक आरोग्य केंद्रातील सूत्रांनी दिली.