पणजी -गोयंकारपण वृत्त
राज्यातील आरोग्य क्षेत्राच्या व्यवस्थापनावर जाहीर चर्चेसाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आमंत्रित केले आहे. सदर आव्हान करताना राणे म्हणाले की, विरोधी पक्षांनी माहितीची अधिक तथ्य-तपासणी करण्याची आवश्यकता आहे.
राणे म्हणाले,”जर गिरीश यांना वादविवाद करायचे असतील तर कृपया अद्ययावत व स्पष्ट गोष्टी मांडाव्यात . गोव्याचे ‘प्रोफेलेक्सिस’ उपचाराचे मॉडेल अनेक राज्यांनी अवलंबिंत केले आहेत. कदाचित गिरीश चोडणकर यांना याची माहिती नसेल आणि सध्याच्या घडामोडीं समजण्यासाठी अधिक चांगल्या साधनांची त्यांना गरज आहे,”.
राणे यांनी स्पष्टीकरण दिले की ‘डब्ल्यूएचओ’ने व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना,देशांना / राज्यांना सदर तत्वे विकसित करण्याचे आणि स्वत: चे स्वतंत्र उपचाराचा संच तयार करण्याची लवचिकता देण्यास मान्यता दिली आहे.
तज्ञांच्या गटाने प्रोफेलेक्सिस उपचारांची शिफारस केली असल्याचेही ते म्हणाले.
ते म्हणाले, “गिरीश हे ना तज्ञ आहेत,ना पंचायत किंवा विधानसभेचे सदस्य आहेत.
गोवा सरकार लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत संवेदनशील आहे. आम्ही डॉक्टरांच्या एका तज्ञ गटाने राज्यातील तज्ज्ञ समितीच्या अधिकृततेचा सल्ला घेतला आहे. शिक्षक असणाऱ्या गिरीश सारख्या एखाद्या व्यक्तीला कमी ज्ञान पाहून वाईट वाटले.”
राणे म्हणाले, “कॉंग्रेस पक्षाकडे नुसतीच चुकीची माहिती आहेत आणि त्यांना कोणताही उपाययोजना सुचवण्याची ताकद नाही.”
गोव्याचा विचार करता,आम्ही ‘होम आयसोलेशन किट ‘वितरित करण्यास सुरुवात केल्यापासून आम्ही ‘इव्हर्मेक्टिन’चा वापर फार काळापासून करीत आहोत आणि त्याचे कार्य सिद्ध झाले आहे.
दरम्यान, राणे यांनी स्पष्टीकरण दिले, की ‘इव्हरमेक्टिन’ गोळयामध्ये कसलाही गोलमाल नाही.राज्यातील खरी गोलमाल म्हणजे कॉंग्रेस पार्टी आणि चोडणकर आहेत.